लाखभर साहित्यसंपदा व साहित्यऐवज असलेली प्राचीन गुंफा..
लहानपणी एक गोष्ट होती 'अलिबाबाची गुफा'. आज खरोखरच एका भव्य दिव्य अलिबाबाच्या गुहेचा यथोचित अनुभव आला. सुरवातीच्या कक्षात 'सोन'...त्यातल्या आत 'सोन'...आणि त्यातल्या आत 'हिरे-दागिने-माणिक'
फरक एवढाच होता कि, या गुहेत होता तो असंख्य पुस्तकांचा,मासिकांचा,ग्रंथांचा,असंख्य लेखकांनी आजवर लिहलेल्या लेखकांचा,अनुवादित साहित्याचा,जेष्ठय समीक्षक-साहित्यिक स्व.द भि कुलकर्णी यांनी मृत्यइच्छेत दिलेल्या दहा हजार पुस्तकांचा आणि दुर्मिळ साहित्याचा 'अलौकिक साहित्य ऐवज'...आणि त्याशिवाय तिथे असलेल्या दोन लाख संदर्भ पुस्तकांचा....
हि कल्पनेतील कथा नसून वास्तवातील आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर सारख्या ग्रामीण भागात असलेल्या जेष्ठय साहित्यिक-ग्रंथालय संचालक श्री.श्याम जोशी सर यांच्या 'ग्रंथसखा' या वाचनालय संस्थेची आहे. मूळ वाचनालयाच्या सोबतच श्याम जोशी सरांनी आणखी एका इमारतीच्या तळघरात वाचनालायसोबतच 'संशोधन केंद्र' निर्माण केले आहे.तेथे बसून अनेक संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना,अभ्यासकांना आणि साहित्यप्रेमींना साहित्यातील अनेक पुस्तकांचा शोध घेता येतो सोबतच आत मध्ये बसण्याची व्यवस्था आहे.तसेच तिथे ग्रंथपाल विषयीचे प्रशिक्षण वर्ग देखील चालवले जातात.
त्यानुरूप आतील दालनात पंधरा-वीस विद्यार्थी बसतील एवढी जागा आणि 'आधुनिक अध्ययन कक्ष' स्थापन करण्यात आले आहे.तसेच वाचनालयाचे वाचक वर्ग हे केवळ बदलापूर किंवा जवळील स्थानिक नसून तेथे मुंबई शहरातील कुर्ला,वडाळा,अंधेरी,दादर येथून वाचक वर्ग आणि सभासद येतात तसेच 'अध्ययन' आणि 'संशोधन' अभ्यासासाठी या संशोधन केंद्रात नाशिक,भुसावळ,लातूर ई. लांबच्या आणि मुंबई बाहेरच्या शहरातून साहित्य संशोधक,अभ्यासक आणि साहित्य प्रेमी येथे येतात इथे आल्यावर त्यांना राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून संचालकांनी स्वतंत्र आराम खोलीची व्यवस्था केलेली आहे. सुमारे लाखभर पुस्तकांनी सुसज्ज असलेलं हे संशोधन केंद्र हे शासनाच्या अनुदानाशिवाय केवळ ग्रंथ संचालक श्याम जोशी आणि ग्रंथसखा वाचनालयातील हजारो वाचक यांच्या सहयोगाने आणि देणगीने आजवरच्या सर्व ग्रंथालय,वाचनालय आनइ संशोधन केंद्र असलेले ठाणे जिल्यातील एकमेव 'स्वायत्त मराठी विद्यापीठ' ठरले आहे.
वर्षानुवर्षे निर्मित साहित्य 'ग्रंथसखा' या वाचनालय संस्थेने आणि तेथील संचालक श्याम जोशी सर तसेच तेथील अधिकारी वर्ग आणि वाचकांनी तेथील साहित्य संस्कृती आणि वाचन परंपरा समृद्ध केली आहे. आणि या साहित्य सेवा चळवळीला दिन रात अखंडपणे वाचक आणि साहित्यप्रेमींना उपलब्ध करून देण्याची जवाबदारी आणि खऱ्या अर्थाने साहित्य संस्कृती संवर्धन,जतन करण्याचे मौलिक कार्य आजही अतिशय तन्मयतेने,निष्ठेने आणि साहित्यसेवेत आपले जीवन समर्पण करून श्री.श्याम जोशी सर करत आहे.
नुकताच सरांना महाराष्ट्र शासनाचा 'भाषा संवर्धक' हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
अश्या या महान साहित्यसेवे साठी अवघ जीवन झोकून देणाऱ्या श्याम जोशी सरांना आणि त्यांच्या साहित्य सेवेला मानाचा मुजरा...
शब्द संकलन - सचिन सुशील
'एक दिवस,एक लेखक' क्रिएटिव्ह टीम