एक दिवस,एक लेखक
आयु.शुक्राचार्य गायकवाड़
(ज्येष्ट कवी)
व्यवसाय : प्राध्यापक म्हणून महाविद्यालयीन सेवानिवृत्ति
'प्रतिमा,कल्पना,भावना, विद्रोह आणि वेदना तसेच शब्दांचा साठा असला की,कवितेच्या वाटा सहजपणे निर्माण होतात.या वाटेने कवी जावु लागला की उत्स्फूर्त कवितेचा जन्म होतो' ही माझ्या कवितेची व्याख्या....
वरील व्याख्या आतून येण्यासाठी मला ४२ वर्षे लागली. आणि समाधान वाटले.
कविता माझा लहानपना पासूनच आवडीचा विषय...माझा पहिला कविता संग्रह निघाला तो म्हणजे 'निंबार'. निंबार म्हणजे रखरखित दुपारचे 'उन'. हा कविता संग्रह खुप गाजला. संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले कविवर्य कुसुमाग्रज यांचा आशीर्वाद लाभला.विचारवंत आणि समीक्षक प्रा.केशव मेश्राम यांची प्रस्तावना लाभली आणि प्रकाशन कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते झाली. त्यानंतर माझी १६ काव्यसंग्रह प्रकाशित झाली. पण त्याआधी 'समानता' (१९८२) नावाची एकांकिका लिहिली त्याला पुण्यात प्रथम क्रमांक मिळाला आणि इतर पारितोषक देखील मिळाली.
काव्याचे विविध प्रकार मी लिहले आहेत. आकाशवाणी व् दूरदर्शन वर अनेकवेळा विविध काव्य कार्यक्रम सादर केलेले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या एकांकिका,अभिनय एकपात्री नाट्यछटाही लिहिल्या. मुलांसाठी डॉ.बाबासाहेबांच्या जीवनावरील पुस्तकेही मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेत लिहिले आहेत.
त्याचसोबत मुलांसाठी बरीचसी बालगीते,भीमगीते आणि धम्मगीते ही लिहली. ती गीते सुप्रसिद्ध गायक-संगीतकार दत्ताजी जाधव,संगीतकार प्रा.श्याम क्षीरसागर, कुमारी गाथा जाधव,गंधार जाधव,शीतल खांडेकर,लक्ष्मीताई बोरकर,इंदुताई बोरकर अश्या अनेक गायकांनी गायली. विशेष म्हणजे प्रल्हादजी शिंदे यांनी माझी गीते गायली आहेत.
भविष्यात माझ्या गावच्या भाषेतील 'ब बला काना बा' हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
रसिकांनी माझ्यावर भरभरुन प्रेम केले हे माझे समाधान आणि हीच माझी खरी कमाई आहे असे मी मानतो...
- शुक्राचार्य गायकवाड़ (डोंबिवली)
========================================================================
"माझी कविता माझ्या माणसांशी बोलत राहते
आपल्या मातीशी इमान राखून राहते माझी कविता"
"पाऊस येण्यापूर्वी सर्वांचाच नजरा आभाळाकडे असतात पण,
झोपड़ीतल्या नजरा मात्र लागून असतात फाटलेल्या छपराकडे....
तेथील मूल गाणे गातच नाहीत
"येरे येरे पावसा तुला देतो पैसा...पैसा झाला मोठा,पाऊस आला मोठा..."
तिथले मुले गातात....
"ये ग ये भाकरी,मला दे चाकरी....चाकरी आली धावून....घरात पाऊस पड़ताच,भाकरी गेली वाहून...."
"आम्ही या भारत देशाचे,देशात स्थान नाही
दुसऱ्यास मिळे दाम,आम्हास काम नाही..."

माझा सरांशी परिचय अत्यंत लांबुन राहिला असला तरी माझ्या घरातील त्यांच्या
विविध कविता संग्रहातून त्यांच्या प्रत्येक कविता खुप भावल्या आहेत.
त्यांचे कायम वाचन राहिले आहे.कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक
कार्यक्रमात आमची औपचारिक भेटी होतात.पण सरांच्या विचारातूनच जाणीवसमृद्ध
भावनासापेक्ष अनुभव पाहायला आणि वाचायला मिळतो नेहमीच...कविते विषयी ते सांगतात....
"माझी कविता माझ्या माणसांशी बोलत राहते
आपल्या मातीशी इमान राखून राहते माझी कविता"
त्याचवेळी समाजातील दुःख ते अश्या ओळीतून माडतात की...
"पाऊस येण्यापूर्वी सर्वांचाच नजरा आभाळाकडे असतात पण,
झोपड़ीतल्या नजरा मात्र लागून असतात फाटलेल्या छपराकडे....
तेथील मूल गाणे गातच नाहीत
"येरे येरे पावसा तुला देतो पैसा...पैसा झाला मोठा,पाऊस आला मोठा..."
तिथले मुले गातात....
"ये ग ये भाकरी,मला दे चाकरी....चाकरी आली धावून....घरात पाऊस पड़ताच,भाकरी गेली वाहून...."
तसेच रोजमर्रा जीवनातील बेकारी बघुन त्यांनी 'व्यथा' मांडली की....
"आम्ही या भारत देशाचे,देशात स्थान नाही
दुसऱ्यास मिळे दाम,आम्हास काम नाही..."
आयुष्यातील प्रत्येक क्षणाची जाणीव राखताना त्यांनी लिहिले आहे की....
"जाणीव नाही क्षणाची,जुनेच पान वाचते
लागल्यात ठोकरा,जुनीच वाट चालते....."
(क्रमशः)
"जाणीव नाही क्षणाची,जुनेच पान वाचते
लागल्यात ठोकरा,जुनीच वाट चालते....."
(क्रमशः)
वरील सर्व कविता शुक्राचार्य सरांच्या 'या निळ्या नभाखाली...' या काव्यसंग्रहातील आहेत.
माणसातील माणूसपन कवितेच्या अर्थबोध शब्दांतून अतिशय संवेदनशील पने काळजला
हात घालून प्रत्येक कवीची कविता रचना निर्माण होत असते...असे मला वाटते
कायमच !
आपल्या लेखनीतून सदैव शांतीभावना आणि मंगलकामना जपणाऱ्या या
ज्येष्ट कविवर्य शुक्राचार्य गायकवाड़ सरांना पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक
शुभेच्छा....
-सचिन सुशील.
No comments:
Post a Comment